आपलं महानगर इम्पॅक्ट: मुंबई पोर्ट ट्रस्टने डम्पिंग प्रकरणाची चौकशी लावली

आपलं महानगर इम्पॅक्ट: मुंबई पोर्ट ट्रस्टने डम्पिंग प्रकरणाची चौकशी लावली

डम्पिंग ग्राऊंड

मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी मांडवा येथील गाळ उपसनी केलेला गाळ डम्पिंग करणे या काम करिता देण्यात आलेल्या परवानगी मधील अटींचा भंग करून आणि या कामात साडेसोळा कोटींच्या घोटाळा केल्या संबंधित वृत्त दैनिक आपलं महानगरने प्रकशित केले होते. त्यानंतर खळबळून जागे झालेले मुंबई पोर्ट ट्रस्ट या संबंधित सखोल चौकशीचे आदेश देण्यांत आले आहे.

मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान रो-रो सेवेकरीता नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या कामासाठी अंदाजे 18.12 कोटी इतक्या किंमतीच्या अंदाज पत्रकास प्रशासकिय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून खासगी कंपनीस हे काम देण्यात आले होते. या कामासाठी एकूण 16 कोटी 54 लाख 02 हजार 510 इतके बील कंत्राददाराला आदा करण्यात आले होते. मुंबई पोर्ट ट्रस्टने दिलेल्या परवानगीमधील अटीनुसार एमएमबीने गाळ काढण्याच्या जहाजांची नोंद केली नसल्याने तसेच काढलेला गाळ मुंबई पोर्ट ट्रस्टने सांगितलेल्या ठिकाणी टाकला नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला केली होती. मात्र यावर दखल घेतली नव्हती.

दैनिक आपलं महानगरने या संबंधित वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या मांडवा येथे गाळ काढण्याच्या साडेसोळा कोटींच्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या तक्रारीनुसार मुंबई पोर्ट ट्रस्टने चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपसंरक्षक यांनी जलआरेखक (हायड्रोग्राफर) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांना यांना पत्र लिहून कार्यवाही बाबत त्यांना निर्देश दिले आहे. सदयस्थितीमध्ये मांडवा येथे साचलेच्या प्रचंड गाळामुळे सांयकाळच्या वेळेमध्ये सध्या सुरू असलेल्या लाँचेसही धक्क्याला लागण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे रो रो सेवेचे प्रचंड जहाज येथे आणणे कठीण असल्याची प्रतिक्रीयाही दैनिक आपलं महानगरशी बोलताना सावंत यांनी दिली आहे.

गाळ काढण्याचा लावला सपाटा

मुंबई पोर्ट ट्रस्टने पुन्हा एकदा गाळ वाहून नेणा-या बार्जेसना ट्रेकिंग सिस्टीम बसवून त्यांची नोंद पोर्ट ट्रस्टच्या व्हेसल ट्रेकिंग मॅनेजमेंट सिस्टीम (व्हीटीएस) या यंत्रणेकडे उपलब्ध नाही असे कळविले आहे. मे.रॉक अँड रिफ ड्रेझिंग प्रा.लि. या कंपनीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून मांडवा येथील गाळ काढण्याच्या कामासाठी एकूण 16 कोटी 54 लाख 02 हजार 510 इतके बील कंत्राददाराला आदा करण्यांत आले असल्याची माहिती अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांना मेरीटाईम बोर्डाकडून देण्यांत आली होती.

ज्या महत्वाकांक्षी रो रो सेवेच्या नावाखाली गाळ काढण्याचा हा सपाटा सुरू आहे ती सेवा प्रत्यक्षात वर्ष उलटूनही सुरू होत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. त्यातच रो रो सेवेच्या नावाखाली करोडोंची कामे मेरीटाईम बोर्डामार्फत सुरू करण्यांत येत असल्याने या मार्गावर जलप्रवास करणा-या प्रवाशांमध्ये हा चर्चेचा विषय झाली आहे.

First Published on: May 20, 2019 4:01 AM
Exit mobile version