अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या पित्याला शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या पित्याला शिक्षा

प्रातिनिधिक छायाचित्र

आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी पित्याला शुक्रवारी दिडोंशी सेशन कोर्टाने दोषी ठरवून बारा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चार वर्ंषापूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. अखेर आरोपीस सेशन कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

गोरेगाव येथे सोळा वर्षाची पीडित मुलगी तिच्या ४९ वर्षाच्या पित्यासोबत राहत होती. घरात कोणीही नसताना तो दहा
वर्षांपासून तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होता. वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्याच्याकडून तिच्यावर लैगिंक अत्याचार
सुरुच होता. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नये म्हणून तो तिला सतत जिवे मारण्याची धमकी देत होता. या अत्याचाराला ती प्रचंड कंटाळली होती. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या आईसह बहिणीला सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना
धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी आरोपी विरुद्ध आरे पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या जबानीवरुन
पोलिसांनी पित्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर करत होते. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत होता. यावेळी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी दिडोंशीतील सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले. या खटल्याची नियमित सुनावणी सुरु असताना पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची जबानी आणि इतर बाबींची कोर्टाने नोंद घेतली. अलीकडेच या खटल्याची
सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कोर्टाने आरोपी पित्याला बलात्कारासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवून
त्याला शुक्रवारी बारा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

First Published on: June 28, 2019 10:00 PM
Exit mobile version