मुंबईत ९ वर्षाचा मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबईत ९ वर्षाचा मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील एका टॉवरमध्ये ९ वर्षाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्यासोबत खेळणाऱ्याच मित्रांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असून ते देखील अल्पवयीन आहेत. या आरोपींचे वय  १० आणि ११ वर्ष आहे. टॉवरच्या १२ व्या आणि १३ मजल्याचा कॉरिडोवरमध्ये या दोन्ही अल्पवयीन मुलांनी पिडीत मुलीला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. ३० जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.

गुन्हेगारांना अटक

घटना घडल्यावर दुसऱ्या दिवशी पिडीत मुलीला जेव्हा त्रास सुरू झाला तेंव्हा घडला प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर धक्का बसलेल्या तिच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटने प्रकरणी पीडितेच्या आई-वडीलांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सदर घटनेतील आरोपी असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी आणि हे दोन्ही आरोपी एकत्र खेळत होते. खेळता खेळता ते पीडित मुलीला १२ आणि १३ व्या मजल्याच्या कॉरिडोवरमध्ये घेऊन गेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची त्यांनी कबुली दिली.

गुन्हा दाखल

अल्पवयिन आरोपींविरोधात आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयिन असल्यामुळे त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

First Published on: February 6, 2019 9:41 PM
Exit mobile version