शबाना आझमी यांना घरपोच मद्य मागवणं पडलं महाग

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना घरपोच मद्य मागवणं चांगलच महागात पडलं आहे. पैसे देऊनही संबंधित कंपनीने मद्य घरपोच न दिल्याने शबाना यांनी संबंधित कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. त्याचबरोबर कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती मुंबई पोलिसांना टि्वटमधून केली आहे.

शबाना यांनी यासंदर्भात टि्वट केलं आहे. या टि्वटमध्ये लिविंग लिक्विड्ज या कंपनीने माझी फसवणूक केल्याचे शबाना यांनी म्हंटल आहे. मी या कंपनीकडे ऑर्डर दिली. पैसेही ऑनलाईन भरले. पण मला माझी ऑर्डर मिळालीच नाही. तसेच आता ते माझा फोनही घेत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण आपण किती पैसे आगाऊ भरले हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. या टि्वटनंतर शबाना यांनी मुंबई पोलिसात संबंधित कंपनीविरोधात तक्रार दाखल केली.

 

त्यानंतर त्यांनी दुसरे टि्वट केले आहे. त्यात लिविंग लिक्विड्जच्या मालक सापडला असून ते फ्रॉड करत असल्याचे समोर आले आहे. लिविंग लिक्विड्ज कंपनीशी त्यांचा काहीही संबंध नाही. असे शबाना यांनी टि्वटमध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि सायबर क्राईमला मी विनंती करते की अशा गैरमार्गाने व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. असेही शबाना यांनी म्हटले आहे.

First Published on: June 24, 2021 7:04 PM
Exit mobile version