राज्यापालांची पत्रातील भाषा योग्य नाही; ‘त्या’ पत्रावर शरद पवार नाराज

राज्यापालांची पत्रातील भाषा योग्य नाही; ‘त्या’ पत्रावर शरद पवार नाराज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांवरुन खरमरीत पत्र लिहिले होते. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरन्ट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळेस दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून सुनावले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत आपली बाजू मांडली. मात्र हे प्रकरण इथेच मिटले नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांच्या त्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्यपालांना उद्देशून म्हटले आहे की, दुर्दैवाने राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिल्यासारखे मानले जात आहे. आपल्या राज्यघटनेच्या अगदी प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द जोडला गेला आहे. ज्यामध्ये सर्व-धर्म-समभाव असे नमूद केले आहे आणि त्याचे रक्षण होते. म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीने संविधानाच्या अशा आचारांचे समर्थन करणे अपेक्षित आहे. याबाबत मी माझे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही मांडले आहे. मला खात्री आहे की त्यांनासुद्धा यातील अंतरंग भाषा लक्षात आली असेल. तसेच पत्रात वापरली जाणारी भाषा ही घटनात्मक स्थान असलेल्या व्यक्तीसाठी योग्य नाही, असे पवार यांनी राज्यपालांसाठी नमूद केले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, मी मान्य करतो की राज्यपालांकडे या विषयावर आपले स्वतंत्र मत असू शकते. राज्यपालांनी या पत्राद्वारे आपली मतं मांडण्याच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. परंतु राज्यपालांचे पत्र माध्यमांना प्रसिद्ध करण्यात आले हे पाहून मला आश्चर्य वाटले.

काय आहे प्रकरण 

राज्यात मंदिरे उघडण्याकरता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहित उत्तर दिले आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना हिदुत्वाचा विसर पडलाय का? असा सवाल केला होता. याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना माझ्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हटले आहे. मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोला देखील लगावला आहे.

हेही वाचा –

आत्महत्येचं गुढ! कुंडलीत योग; दोन सख्ख्या भावांनी एकामागोमाग दिला जीव

First Published on: October 13, 2020 7:51 PM
Exit mobile version