Nawab Malik ED enquiry : नवाब मलिक यांच्यावर आज ना उद्या कारवाई होईल, याबाबत कल्पना होती – शरद पवार

Nawab Malik ED enquiry : नवाब मलिक यांच्यावर आज ना उद्या कारवाई होईल, याबाबत कल्पना होती – शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर नवाब मलिक प्रकरणातही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अंडरवर्ल्ड कनेक्शन मुस्लिम कार्यकर्त्यांशी साहजिकच जोडला जातो असेही त्यांनी भाष्य केले. एकुणच केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्रास दिला असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही आम्हाला माहित होती.’

काय म्हणाले शरद पवार ?

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाई हे काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे, त्यानुसार आज ना उद्या हे घडेल याची कल्पना होती. पण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना अशा पद्धतीने त्रास दिला जाईल, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करायचे काही गरज नाही. कशाची केस काढली आहे हे आम्हाला माहित नाही. पण जे काही घडले आहे, त्यामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय हे स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री असताना माझ्यावरही अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोप  

आतापर्यंत एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याचे नाव अंडरवर्ल्डशी जोडणे यात काही नवीन नाही. याआधी मी राज्याच्या मुख्यमंत्री होतो त्यावेळी माझ्यावरही दाऊद कनेक्शन असल्याचा असाच आरोप झाला होता. तशीच नाव घेऊन लोकांची नाव घेणे बदनाम करणे आणि सत्तेचा गैरवापर करणे हे प्रकार होतात. जे लोक केंद्र सरकारविरोधात भूमिका स्वच्छपणे मांडतात, त्यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारचा त्रास दिला जातो.

आज पहाटे ४.३० वाजता ईडीचे अधिकारी हे नवाब मलिक यांच्या घरी आले. नवाब मलिकांना त्यांच्या कारने ईडीच्या कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. अॅडवोकेट आमीर मलिक हेदेखील नवाब मलिकांसोबत ईडीच्या कार्यालयात गेल्याची माहिती नवाब मलिक यांच्या कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


Nawab Malik : दाऊतच्या नातेवाईकाची जमीन खरेदी, मनी लाँड्रींग प्रकरणी नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी

First Published on: February 23, 2022 10:50 AM
Exit mobile version