इतरांच्या मुलांचे बालहट्ट मी का पुरवू; पवारांचा विखेंना टोला

इतरांच्या मुलांचे बालहट्ट मी का पुरवू; पवारांचा विखेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

दक्षिण अहमदनगर जागेवरून काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेल्या तिढ्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारले असता, पवारांनी विखेंना चांगलाच टोला लगावलाय. “एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो. त्याचा हट्ट पुरविण्याची जबाबदारी इतरांची नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला आणि सुजयला दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी पार्थची उमेदवारी आणि सुजयचा भाजप प्रवेशाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

सुजय विखे- पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असून राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस करता ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे अहमदनगरमधील आघाडीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने सुजय विखे पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखे-पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचसोबत त्यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

First Published on: March 12, 2019 8:05 PM
Exit mobile version