ठाकरेंसाठी एनडीएच्या बैठकीत पुरणपोळीचा खास बेत?

ठाकरेंसाठी एनडीएच्या बैठकीत पुरणपोळीचा खास बेत?

दिल्लीत आज, मंगळवारी एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेकडून कोण उपस्थित रहाणार या संदर्भात अनिश्चितता होती. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे परदेशातून मातोश्रीवर दाखल होताच, शिवसेना नेते सुभाष देसाई यांना दिल्लीसाठी निघण्याचे आदेश देण्यात आले. ही बातमी प्रसिद्ध होताच. दिल्लीतील भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच बैठकीला येण्याची आग्रही भूमिका धरली. या संदर्भात दिल्ली ते मातोश्री फोनवरून संवादही झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांची मागणी मान्य करत दिल्लीत बैठकीला येण्याचं आश्वासन दिलं.

आता मातोश्रीवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर दिल्लीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर निघाले आहेत. एक्झिट पोलनंतर भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी खलबते सुरू आहेत. निकालापूर्वी आगामी रणनिती ठरविण्यासाठी आज एनडीएच्या मित्रपक्षांची भाजपने बैठक बोलावली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंसाठी एनडीएच्या बैठकीत अमित शहा यांनी खास पुरणपोळीचा बेत ठेवल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे निकालाच्या दोन दिवसाआधीत एनडीए पुरणपोळीने एकमेकांच तोंड गोड करणार हे बोललं जात आहे.

First Published on: May 21, 2019 4:01 PM
Exit mobile version