नाराज गायकवाडांची मुख्यमंत्र्यांनी काढली समजूत; गावितांच्या नावावर शिक्कामोर्तब

नाराज गायकवाडांची मुख्यमंत्र्यांनी काढली समजूत; गावितांच्या नावावर शिक्कामोर्तब

शिवसेनेतील नाराजांबाबत सोमवारी मध्यरात्रीपर्यंत ‘वर्षा’ बंगल्यावर खलबते चालली होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली, तर पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मध्यरात्री रंगली चर्चा

सोमवारी दुपारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मध्यरात्री पोचले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उमरग्याचे आमदार ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे होते उपस्थित. या बैठकीत रवींद्र गायकवाड यांना न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

गावितांना शिवसेनेकडून उमेदवारी

त्यानंतर मुख्यमंत्रयांबरोबर राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांचीही बैठक पार पडली. त्यात पालघर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. त्यात पालघरमधून शिवसेनेच्यावतीने राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सोमवारी शिवसेनेकडून पालघर लोकसभा मतदार संघासाठी राजेंद्र गावित यांचे नाव घोषित होण्याची दाट शक्यता. तत्पूर्वी दुपारी ‘मातोश्री’वर राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्यात भेट होणे अपेक्षित असल्याचेही बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी वनगा यांना ‘मातोश्री’वर बोलावून या निर्णयाची कल्पना दिली होती, असे सुत्रांकडून बोलले जात आहे

First Published on: March 26, 2019 9:31 AM
Exit mobile version