१९९२ दंगलीत जोरदार भाषण ठोकणारे, शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत परब यांचे निधन

१९९२ दंगलीत जोरदार भाषण ठोकणारे, शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत परब यांचे निधन

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचे दीर्घ आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. अंधेरी आणि परिसरात त्यांचा वरचष्मा होता. श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून विविध कारखान्यांमधून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. विशेष म्हणजे मराठी तरुणांना मोठ्या संख्येने विविध आस्थपनात त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या. तसेच सामान्य लोकांसाठी रस्तावर उतरून संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.

शिवसेनेच्या या ढाण्या वाघाने १९९२ मध्ये उसळलेल्या दंगलीत प्रक्षोभक भाषण केले असा आरोप जयवंत परब यांच्यावर ठेवण्यात आला होता. याबद्दल सत्त न्यायालयाने त्यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयात याचिता दाखल केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जेव्हा सेनेला जय महाराष्ट्र केला होता. तेव्हा त्यांच्यासोबत परब देखील काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र जयवंत परब हे कट्टर शिवसैनिक होते. त्यांना काँग्रेस फारसी रुचली नाही आणि त्यांनी पुन्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.

 

 

First Published on: September 19, 2020 11:41 PM
Exit mobile version