शिवसेना मुख्यमंत्र्यांचे टेन्शन वाढवणार?

शिवसेना मुख्यमंत्र्यांचे टेन्शन वाढवणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना शिवसेना मुख्यमंत्र्यांचे टेन्शन वाढवणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. नुकत्याच शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे नागपूरमधील सर्वच मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्याने शिवसेनेच्या मनात नेमके चाललंय तरी काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.


हेही वाचा – काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांचा भाजपात प्रवेश


…म्हणून नागपूर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युतीच्या जगावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यातच शिवसेनेला भाजपने दिलेली जागांची ऑफर मान्य नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख स्वतंत्र लढण्याची देखील चाचपणी करत आहे. यामुळेच नुकत्याच सेना भवन येथे पार पडलेल्या मुलाखतीमध्ये नागपुरमधील बाराही विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – …तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – उद्धव ठाकरे


 

युती तुटल्यास भुजबळ शिवसेनेत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे छगन भुजबळ यांना शिवसेनेमध्ये घेण्यास इच्छुक आहेत. भुजबळांचा प्रवेश हा युतीवर अवलंबून आहे. जर शिवसेना भाजपा युती तुटली तर शिवसेनेमध्ये भुजबळांना प्रवेश देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या इच्छुकांच्या घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान काहींनी आपण स्वबळावर लढले पाहिजे, असे मत नोंदवले आहे. येत्या आठवड्याभरात भाजपकडून जागा वाटपाचा जो प्रस्ताव येईल, त्याचा विचार करूनच उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत.

First Published on: September 16, 2019 11:40 AM
Exit mobile version