शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी विधानसभेवर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहेत. सर्वच पक्ष ताकदिनीशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुक शिवसेना लढवणार असल्याचे माहिती मिळत आहेत. याबाबतची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरा करणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिसेना पक्ष प्रमुख यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी ट्विट करत दिले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राजकीय पक्षांची चांगलीच जुगबंदी होणार असल्याचे दिसते आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा विरुद्ध टीएमसीमध्ये चांगलंच राजकारण सुरु आहे. या तापलेल्या राजकारणात आता शिवसेना उडी घेत आहे. या निवडणुकीत भाजप, तृणमूल कांग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसंची पार्टी एआयएमआयएम हे राजकीय पक्ष निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये आता शिवसेनाही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना पश्चिम बंगालमध्ये १०० जागांवर निवडणुक लढवणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आता अधिकृतरित्या घोषणा केल्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालचा दौरा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने आपली ताकद सर्वशक्तिनिशी पणाला लावली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या येण्याने भाजपाला कुठेतरी फटका बसू शकतो. शिवसेनेने २०१९ मध्येही बंगालच्या निवडणुकीत रिंगणात उमेदवार उतरवले होते. यावेळी शिवसेना आणि भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष होते. परंतु महाराष्ट्रात झालेल्या राजकारणामुळे त्यांच्यात ताटातूट झाली.

First Published on: January 17, 2021 7:01 PM
Exit mobile version