पावसाळ्यातील रिकामटेकडया बेडकांचे डराव डराव, शिवसेनेचा मनसेवर पलटवार

पावसाळ्यातील रिकामटेकडया बेडकांचे डराव डराव, शिवसेनेचा मनसेवर पलटवार

पावसाळ्यातील रिकामटेकडया बेडकांचे डराव डराव, शिवसेनाचे मनसेवर पलटवार

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांवरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महानरपालिकेची निविदा केवळ काळ्या यादीत असणाऱ्या ६ कंत्राटदारांना पुन्हा घेण्यासाठी काढण्यात येत असल्याचा आरोप केला. या आरोपावर आता शिवसेनेने पलवार केला आहे. पावसाळ्यातील रिकामटेकडया बेडकांचे डराव डराव सुरु असतात अशी टीका शिवेसेनेकडून करण्यात आली आहे.

“पावसाळ्यात बेडूक डराव डराव करीत असतात. त्याप्रमाणे आता मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने “रिकामटेकडे बेडूक” डराव डराव करून बिनबुडाचे आरोप करीत आहेत,” या शब्दात शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव मनसेच्या आरोपांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.

यावर बोलताना यशवंत जाधव यांनी, “रस्त्यांचे प्रस्ताव शिवसेना बनवत नाही. पालिका प्रशासन बनवते. तसेच, असला प्रस्ताव आमच्या समोर अद्याप मंजुरीला आलेला नाही. जर रस्ते कामांत काही काळेबेरे होत आहे, असा त्यांचा आरोप असेल तर त्यांनी त्याबाबत माहितीसह तक्रार थेट पालिका आयुक्तांकडे करावी. शिवसेनेला मध्ये आणायची व बिनबुडाचे आरोप करण्याची गरजच काय, त्यांचे नेमके दुखणे काय आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले? 

मुंबई महापालिकेच्या २१०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कंत्राटकामात काळ्या यादीतील ६ कंत्राटदारांचा समावेश करण्यात आला आहे. कंपन्यांना कामं मिळावं म्हणून प्रशासन आणि शिवसेना षडयंत्र रचत आहेत. याद्वारे शिवसेना निवडणूक फंड गोळा करण्याचे काम करत आहे. विरप्पन जसा जंगलात लूट करायचा, त्याप्रमाणे मुंबई महापालिकेतील विरप्पन गँग रस्ते कामांत लूट करीत आहे.कंत्राटदारांच्या प्रेमासाठी मुंबईकरांना खड्यात टाकण्याचे काम सत्ताधारी शिवसेना, पालिका प्रशासन करीत आहेत, असे गंभीर आरोप मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी केला आहे.

तसेच, विरप्पन जसा जंगलात लूट करायचा, त्याप्रमाणे मुंबई महापालिकेतील विरप्पन गँग रस्ते कामांत लूट करीत आहे. या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचा रोल काय आहे, याचे स्पष्टीकरण शिवसेनेने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे यांनी वरीलप्रमाणे आरोप केले.
तसेच, रस्ते, खड्डे कामात सत्ताधारी शिवसेनेने करदात्या मुंबईकरांच्या कोटयवधी रुपयांची उधळपट्टी केली. मात्र तरीही मुंबईकरांच्या नशीबी चांगले रस्ते ऐवजी खड्डेच खड्डे आले आहेत. अगोदर रस्ते कामांबाबत काढलेल्या १२०० कोटींच्या निविदा रद्द करून नव्याने २१०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येत असून रस्ते कामांत यापूर्वी घोटाळे केलेल्या ६ कंत्राटदारांना पुन्हा मागच्या दरवाजाने कामे देण्याचे षडयंत्र सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांनी रचले आहे.

विरप्पन रस्त्यावर लुटायचा आणि हे महापालिकेत लुटतात. यांची अनधिकृत कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
मात्र मनसे त्यांचे हे षडयंत्र रस्त्यावर उतरून हाणून पडणार आहे, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच, २१०० कोटींची रस्ते कामे झाल्यावर मुंबईकरांना चांगले रस्ते मिळतील का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.



 

First Published on: October 12, 2021 8:55 PM
Exit mobile version