मुंबई महापालिका : यशवंत जाधव चौथ्यांदा तर चेंबूरकर पाचव्यांदा होणार अध्यक्ष

मुंबई महापालिका : यशवंत जाधव चौथ्यांदा तर चेंबूरकर पाचव्यांदा होणार अध्यक्ष

देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्यांची निवडणूक आजपासून सुरु होत आहे. या निवडणूकीत शिवसेनेचा दणदणीत विजय होण्याची शक्यता असून भाजपचे पानिपत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महानगरपालिकेत शिवसेना ९७ नगरसेवकांसह मोठा पक्ष आहे. तसेच शिवसेनेला विरोधी पक्षातील राष्ट्रवादी, सपाने पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे पारडे जड दिसत असल्याने विजय निश्चित असून भाजपचा पराभव होणार आहे. शिवसेनेकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी यशवंत जाधव यांनी सलग चौथ्या वेळी अर्ज दाखल केला आहे. तर शिक्षण समितीसाठी संध्या दोषी यांनी दुसऱ्यांदा तर सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी तिसऱ्यांदा आणि बेस्ट समितीसाठी आशीष चेंबूरकर यांनी पाचव्यांदा अर्ज दाखल केला आहे.

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत २०१७ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. मागील वर्षी भाजपने आपले उमेदवार उभे करुन शिवसेनेला मात देण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो फारसा यशस्वी ठरला नाही. २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वैधानिक समित्यांच्या निवडणूका ६ महिने उशिराने घेण्यात आल्या होत्या विरोधकांनी शिवसेनेला साथ दिल्यामुळे भाजपला महानगरपालिकेवर झेंडा फडकवता आला नाही.

यावर्षी काँग्रेस वगळता सर्व राष्ट्रवादी आणि ‘सपा’ने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचा चारही वैधानिक समित्यांवर दणदणीत विजय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण समितीची निवडणूक ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता तर स्थायी समितीची निवडणूक २ वाजता होणार आहे. तसेच ६ एप्रिल रोजी सुधार समितीची निवडणूक दुपारी १२ वाजता आणि बेस्ट समितीची निवडणूक दुपारी ३ वाजता होणार आहे.

काँग्रेस उमेदवारी मागे घेणार नाही

मागील वर्षी ऑक्टोबरमद्ये झालेल्या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीआदी उमेदावीर मागे घेत शिवसेनेला साथ दिली होती. मात्र यावेळी आम्ही चारही जागा लढवणार असल्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा यांनी सांगितले आहे.

First Published on: April 5, 2021 10:31 AM
Exit mobile version