राफेल करार बोफर्सचा बाप – शिवसेना

राफेल करारावरून शिवसेनेनं भाजपवर टीकेचे बाण चालवले आहेत. राफेल करार हा बोफर्स घोटाळ्याचा बाप असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. पण बापानं गुन्हा केल्याचा एकही पुरावा हाती नाही. बोफर्स – राफेल व्यवहारामध्ये जनतेच्या पैशाची लुट झाली. पाच रूपयाला मिळणारी वस्तु सरकारी पैशानं २ हजार रूपयांनी कुणी खरेदी करत असल्यास त्याला काय म्हणावे? असा सवाल देखील सामनातून विचारण्यात आला आहे.

सोमवारी सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये राफेल करारासंदर्भातील अहवाल सादर केला. त्याच पार्श्वभूमिवर सामनातून सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. राफेलबाबत जे बंद पाकिट सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आले ते सत्य आहे की पाकीट कोरे आहे त्याबद्दल कुणाला कळेल का? असा सवाल देखील सामनातून विचारण्यात आला आहे. राज्यात सिंचन घोटाळा झाला नाही. त्याप्रमाणे संरक्षण खात्यात राफेल घोटाळा झालेला नाही हे देखील आता मान्य करायला हवे असा टोला देखील सामनातून लगावण्यात आला आहे.

राज्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. त्यामध्ये अजित पवार, सुनिल तटकरेंचं नाव आलं. शरद पवारांविरोधात अण्णा हजारे, गो.रा. खैरनार या मंडळींकडे ट्रकभर पुरावे होते. मुदत संपत आल्यानंतर देखील ही बैलगाडी न्यायालयात का पोहोचली नाही? असा सवाल देखील यावेळी सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

राफेल करारावरून विरोधक आक्रमक

फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीकडून राफेल ही ३६ लढाऊ विमानं घेण्याचा निर्णय झाल्यानंतर घोटाळा झाल्याची टीका करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील राफेल करारावरून सरकारवर टीकास्त्र डागले. त्यामळे सरकारसमोरच्या अडचणी वाढताना दिसत होत्या. दरम्यान यावर दसॉल्ट कंपनीनं देखील स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात आता शिवेसेनेनं देखील सामनातून थेट सरकारवर टिका केली आहे. केंद्र सरकारनं देखील राफेल खरेदीमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.

वाचा – ‘बोफर्सपेक्षा राफेल घोटाळा मोठा’

First Published on: November 15, 2018 9:15 AM
Exit mobile version