Sushant Sucide Case : मुंबई पोलिसांनी तपास लांबवला – संजय राऊत

Sushant Sucide Case : मुंबई पोलिसांनी तपास लांबवला – संजय राऊत

संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी यावेळी पोलिसांना धारेवर धरले असून मुंबई पोलिसांनी हा तपास खुपच लांबवला, असे संजय राऊत त्यांनी दैनिक सामनातील रोखठोकमधून मत व्यक्त केले आहे. शिवाय सुशांत आणि अंकिता लोखंडे विभक्त का झाले, याचा तपास घ्यायला हवा, असेही राऊत यावेळी म्हणाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधतानाच मुंबई पोलिसांनाही कानपिचक्या दिल्या आहेत. शिवाय या प्रकरणी राऊत यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती या दोन अभिनेत्री तरुणी त्याच्या आयुष्यात होत्या. यापैकी अंकिताने सुशांतला सोडले तर रिया त्याच्या सोबत होती. आता अंकिता ही रिया चक्रवर्तीविषयी वेगळे बोलत आहे. मुळात अंकिता आणि सुशांत हे वेगळे का झाले, हादेखील तपासाचा एक भाग असायला हवा, असे संजय राऊत म्हणाले. तसेच या सर्व काळात सुशांत त्याच्या वडिलांना तसेच नातेवाईकांना किती वेळा भेटला, सुशांत किती वेळ पाटण्याला गेला ते समोर येऊ द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंशी संबंध जोडणे चुकीचे 

या प्रकरणात ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे येत आहेत त्यातील बहुतेक ‘डी’ ग्रेड मंडळी आहेत. अनेक वर्षे ती पडद्यावर दिसत नाहीत व इतर व्यवसाय करून ते जगत आहेत. यातील काही लोकांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आला म्हणून जे कुणी जमिनीवर काठ्या आपटत असतील तर ते चुकीचे आहे. या प्रकरणात सरकारविरोधी पक्षाने महाराष्ट्रापेक्षा बिहार पोलिसांची बाजू घेणे हा प्रकार धक्कादायक आहे. बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसात आहेत. तसेच त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे.

हेही वाचा –

संरक्षण मंत्र्यांची घोषणा : १०१ संरक्षण सामुग्रीची आयात करणार बंद

First Published on: August 9, 2020 10:38 AM
Exit mobile version