शरद पवारांचं राजकारण हे चकवा देणारं – संजय राऊत

शरद पवारांचं राजकारण हे चकवा देणारं – संजय राऊत

संजय राऊत यांचा हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास माघार घेतली. त्यांच्या या निर्णयानंतर सर्वच पक्षातून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांचं राजकारण हे चकवे देण्याचं आहे. त्यामुळे कुणीही आश्चर्य वाटून घेऊ नये, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडलांय. पवार यांची निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय एकाप्रकारे पार्थ पवार यांचे लाँचिंग करणारा असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करु शकतील

दरम्यान, ‘ठाकरे कुटुंबियांमध्ये निवडणुका न लढता राजकारणावर अंकुश ठेवणं ही पंरपरा आहे. आदित्य ठाकरे ही हीच पंरपरा पुढे चालवतील.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ‘आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणातच आहेत. भविष्यात आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतील.’ असं देखील त्यांनी सांगितले आहे. ‘अनेकदा कार्यकर्त्यांची इच्छा असते. तरुण पीढिला जर वाटत असेल की राजकारणात यायला पाहिजे. तर आम्ही त्यांना गळ घालू. शेवटी निर्णय उध्दव ठाकरेच घेतील.’,असे राऊत यांनी सांगितले आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेत यावं

दरम्यान, संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय. आता राधाकृष्ण विखे-पाटलांनी शिवसेनेत यावं आणि युती आणखी मजबूत करावी’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे -पाटील यांचे वडील शिवसेनेतून मंत्री पदी होते, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

First Published on: March 12, 2019 5:10 PM
Exit mobile version