एसी लोकलचा प्रवाशांसाठी खुशखबर

एसी लोकलचा प्रवाशांसाठी खुशखबर

पश्चिम रेलवे मार्गावर धावणार्‍या एसी लोकलने प्रवास करण्यार्‍या प्रवाशांसाठी आंनदाची बातमी आहे.आता चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार्‍या एसी लोकलमध्ये प्रवाशांना शॉपिंग करता येणार आहे. पहिल्यांदाच उपनगरीय रेल्वेवर शॉपिंग ऑन व्हिल योजना राबविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गांवर एसी लोकल सुरु करुन दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. तरी देखील या एसी लोकलला प्रवाशांनी पसंती दिलेली नाही. त्यामुळे या लोकलची प्रवासी संख्या कशी वाढविता येईल, यासाठी रेल्वेकडून विविध पर्याय तपासून पाहिले जात आहेत.लांब पल्याच्या काही गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर शॉपिग ऑन व्हिल ही योजना राबविण्यात आलेली आहे. त्यानंतर आता एसी लोकलमध्येही प्रवाशांना शॉपिग करता यावे याकरिता कंत्राटदारांना विचारण्यात आले आहे. त्यासाठी निविदासुध्दा काढण्यात आली आहे.

हे कंत्राट 5 वर्षांचे असणार आहे. एसी लोकलमध्ये प्रवाशांना विविध सौंदर्य प्रसाधने,आरोग्य विषयक काही उत्पादने, लॅपटॉप आणि मोबाईल साहित्य, छोटी खेळणी आणि इतर काही सामान एमआरपीनुसार खरेदी करता येणार आहे. हे सामान विकण्यासाठी ट्रेनमध्ये ट्रॉली असणार आहे. ही ट्रॉली ऑपरेट करणार्‍या ऑपरेटरची नेमणुक करण्याचे काम परेने हाती घेतलेले आहे. ही ट्रॉली ३ फूट उंच असणार आहे.

हे सामान विकण्यासाठी ४ सेल्समनची नेमणूक करण्यात येणार आहे. या सेल्समनला युनिफार्म आणि आय कार्डदेखील पुरविण्यात येणार आहे. विक्रीसाठी असलेल्या उत्पादनांची यादी असलेले कॅटलॉग या सेल्समनकडेअसणार आहे. त्यानुसार प्रवासी खरेदी करु शकणार आहेत. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे ऑन व्हिल शॉपिंग करता येणार आहे.

First Published on: January 21, 2020 7:00 AM
Exit mobile version