न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका, प्रार्थनास्थळांवरीलही अवैध भोंगे काढा, ध्वनी प्रदूषणाविषयी जनजागृती करा, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा,असे आदेश दोन वर्षांपूर्वी देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने हायकोर्टाकडून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांना न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल ’कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत या नोटिसीला उत्तर देण्याचे आदेशही आयुक्तांना देण्यात आलेत.

सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचलाग यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोग्यांविरोधात दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने सविस्तर निकाल दिलेला आहे. त्यानुसार आदेशांची पूर्तता न झाल्याने याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. वरील विषयांवर तत्काळ अंमलबजावणी करा असे आदेश न्यायालयाने २०१६ मध्ये दिले आहेत. मात्र अजूनही त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याबद्दल शुक्रवारी हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांना थेट नोटीस बजावली. वाढत्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1719 ध्वनी मापक यंत्रे घेऊन ती राज्यभरातील पोलीस ठाण्यांना दिली गेली आहेत. याद्वारे आवाज मोजून पोलीस संबंधितांवर कारवाई करतील, असे शासनाने त्यावेळी न्यायालयाला सांगितले होते.

First Published on: September 16, 2018 4:00 AM
Exit mobile version