सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात; ८ ट्रॅफिक ब्लॉक

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात; ८ ट्रॅफिक ब्लॉक

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम आजपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्यासाठी पुढील दोन महिने आठवड्यातून चार दिवस हा पूल बंद राहणार आहे. सायन उड्डणपुलाचे बेरिंग बदलण्याचे काम आजपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.

पहिला ट्रॅफिक ब्लॉक १७ फेब्रुवारीला

वाहतुकीच्यादृष्टीने उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याकरता एकूण आठ ८ ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आले असून मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर केले असून त्यातील पहिला ट्रॅफिक ब्लॉक आजपासून १७ फ्रेबुवारीला सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे.

बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण झाल्यावर उड्डाणपुल बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये डांबरीकरणाच्या कामाचा देखील समावेश असणार असून या कामासाठी वाहतुकीसाठी सलग २० दिवस बंद ठेवण्याचे नियोजन आहे.

ट्रॅफिक ब्लॉकचे वेळापत्रक

First Published on: February 14, 2020 2:40 PM
Exit mobile version