स्कीमर डिवाईस ,कॅमेरा डिवाईस फसवणुकीचा प्रयत्न

स्कीमर डिवाईस ,कॅमेरा डिवाईस फसवणुकीचा प्रयत्न

एटीएम मशीनवर स्कीमर डिवाईस व कॅमेरा डिवाईस लावून बँकेतील खातेधारकांची माहिती घेवून खातेधारकांची तसेच बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. तळोजा पोलिसांनी १ जुलै रोजी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बँक ऑफ महाराष्ट्रची तळोजा पाचनंद येथे शाखा आहे. या एटीएम मशीनमध्ये कॅश डिपॉझीट करण्यासाठी आलेले सिक्युअर व्हल्यु इंडीया प्रा. लि. या कंपनीच्या टेक्नीशीयन राहूल मोरे यांनी कोणीतरी एटीएम मशीनच्या कार्ड रिडरवर स्कीमर डिवाईस आणि एटीएम किबोर्डच्या वरील बाजूस कॅमेरा डीवाईस लावून ठेवले असल्याचे बँकेचे मेनेजर प्रशांत वाघमारे यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. यावेळी त्यांना २७ जुलै रोजी दोन नायजेरीयन इसम एटीएम मशीनमध्ये आल्याचे दिसले त्या दोघांनी त्यांच्याजवळील कॅमेरा डिवाईस व स्कीमर डिवाईस एटीएम मशीनमध्ये लावले. त्यातील एका इसमाने अंगात पांढर्‍या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व डोक्यात निळया रंगाची कप घातली असून त्याचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष आहे.

First Published on: July 7, 2019 4:40 AM
Exit mobile version