भाईंदर बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे अटकेत

भाईंदर बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे अटकेत

नवघर पोलिसांनी बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणार्‍या दोन जणांना अटक करून दहा लाख रुपये किंमतीचे कातडे जप्त केले

 केंद्र सरकारने बंदी घातली असतानाही बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या दादरा नगर हवेली या केंद्राशासित प्रदेशातील दोन जणांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

बिबट्याची कातडी विकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाच्या सहाय्याने भाईंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट परिसरात सापळा रचला होता. यावेळी दोन संशयास्पद इसमांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात बिबट्याचे कातडे आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी अंकीत जयेश पटेल ( 24, रा. पटेलपाडा, मोरखल, ता. सेल्वासा, दादरा नगरहवेली) आणि रवींद्र वसंत पटेल(25, रा. सायली सालकापाडा, दादरा नगरहवेली) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे. हे कातडे कुणाला विकण्यासाठी आले होते, यामध्ये एखादी टोळी सक्रीय आहे किंवा काय यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: December 12, 2019 5:28 AM
Exit mobile version