लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांना मुंबई लोकलमध्ये No Entry

लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांना मुंबई लोकलमध्ये No Entry

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना लोकलच्या प्रवासास परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिला प्रवाशांना मुंबईच्या लोकलने प्रवास करण्यास काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून परवानगी दिली होती. महिलांना मिळालेल्या लोकल प्रवासाच्या परवानगीनंतर कित्येक महिला वारंवार त्याच्यासोबत लहान मुलांना घेऊन प्रवास करत असल्याचे समोर आले होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुलांनी लोकलने प्रवास करणं धोक्याचे आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलने फक्त महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. तर त्यांच्यासह लहान मुलांना प्रवास नाही.

काही दिवसांपूर्वी अनलॉक प्रक्रियेअंतर्गत महिलांना लोकलने प्रवासाची मुभा दिली होती. मात्र अनेक महिला यावेळी लहान मुलांसह प्रवास करतांना रेल्वेच्या निदर्शनास आली. मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता लहान मूल घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.

१७ ऑक्टोबरपासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉक झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिला प्रवाशांना रेल्वेने परवानगी दिली. दरम्यान रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर पुढे प्रवास करता येणार आहे.


कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड अवैध; हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला दणका

First Published on: November 27, 2020 12:58 PM
Exit mobile version