प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एसएनडीटीच्या विद्यार्थिंनींची निवड

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एसएनडीटीच्या विद्यार्थिंनींची निवड

हिमाद्री पंड्या व श्रद्धा वंजारी

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीमध्ये राजपथावर होणार्‍या राष्ट्रीय संचलनासाठी मुंबईतून पाच राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनी तर मुंबई विद्यापीठातून दोन विद्यार्थी व एक विद्यार्थिनीची निवड झाली आहे. एनएसएसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मुंबईतून पाच विद्यार्थ्यांची झालेली निवड मुंबईसाठी गौरवास्पद आहे.

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी होणार्‍या राष्ट्रीय संचलनासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी नुकतेच नागपूर येथे कॅम्प झाले. कॅम्पमध्ये राज्यातील विविध विद्यापीठातून जवळपास 44 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये एसएनडीटी विद्यापीठातून दोन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. नागपूर कॅम्पमधील खडतर सरावानंतर 44 विद्यार्थ्यांमधून सात मुले व सात मुलींची दिल्लीमध्ये होणार्‍या राष्ट्रीय संचलनालयासाठी निवड करण्यात आली. यामध्ये मुंबईतून पाच जणांची निवड झाली. एसएनडीटीने कॅम्पसाठी पाठवलेल्या हिमाद्री पंड्या व श्रद्धा वंजारी या दोघींची निवड झाली आहे.

राष्ट्रीय संचलनालयासाठी एसएनडीटी विद्यापीठातून सलग तिसर्‍या वर्षी एनसीसीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. देशातील 200 मुलांमध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या दोन्ही विद्यार्थ्यांनीची निवड होणे हे आमच्या विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याचबरोबर एनसीसीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय संचलन करण्याची संधी मिळणे हे माझ्यासह माझ्या कुटुंबियांसाठी गौरवाची बाब आहे. राजपथावर संचलन करण्याच्या भावनेने माझ्यामध्ये उत्साह संचारला असल्याचे एसएनडीटी विद्यापीठाच्या बी.टेकच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या हिमाद्री पंड्या हिने सांगितले.

राजपथावर संचलन करण्यासाठी माझी निवड झाल्याचे जेव्हा मला आमच्या शिक्षकांकडून कळले तेव्हा मला रडूच कोसळले. मला काय करावे हे सूचत नव्हते. राष्ट्रीय संचलनालयासाठी माझी निवड झाल्याने आई- वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राजपथावर संचलन करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. प्रजासत्ताक दिनी उत्तम प्रकारे संचलन करण्यासाठी आम्ही सरावाला सुरुवात केली असल्याची माहिती एसएनडीटीमध्ये बॅचलर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या दुसर्‍या वर्षात शिकत असलेल्या श्रद्धा वंजारी हिने दिली.

First Published on: December 12, 2018 4:22 AM
Exit mobile version