ठाण्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत लवकरच नवीन धोरण

ठाण्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत लवकरच नवीन धोरण

भाजपाकडून निवडणूक आयोगाकडे  प्रभागरचना रद्द करण्याची मागणी

पाणी समस्येवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत लवकरच नवीन धोरण बनविण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. जुन्या इमारतींबरोबरच नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना हे धोरण असणार आहे. याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून शहर विकास विभागाने त्याचा मसुदा तयार करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

पावसाचे पाणी अडविणार

दिवसेंदिवस पाणी प्रश्न बिकट होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी वाया जाते. त्यामुळे वाया जाणारे पाणी वर्षा जलसंचयनच्या माध्यमातून अडविल्यास निश्चितपणे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात जुन्या इमारतींमध्ये ही योजना कशी राबविता येईल, त्यासाठी कोणत्या अतिरिक्त सुविधा देता येतील. त्याचबरोबर नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना त्यांना काय सुविधा देता येतील याबाबत धोरण बनविण्यात येणार आहे.


हेही वाचा – ठाणे परिसरात अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढले


 

First Published on: July 3, 2019 7:53 PM
Exit mobile version