Corona: मुंबई शहरातील आरोग्य यंत्रणेसाठी ३ कोटी ६३ लाखांचा निधी

Corona: मुंबई शहरातील आरोग्य यंत्रणेसाठी ३ कोटी ६३ लाखांचा निधी

कोरोना व्हायरस

मुंबई शहर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक आवश्यक यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये ३ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. देशभरात कोरोनाचा फैलाव होत असताना महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २३२ वर पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे, यातले ९८ कोरोनाबाधित मुंबईत आहेत. या पार्श्वभूमीवर या निधीमुळे मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

व्हेंटिलेटर्सची खरेदी होणार!

मुंबईतील कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अधिक सक्षम व्हावे आणि नागरिकांना आरोग्यविषय सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली होती. दरम्यान, यावेळी उपलब्ध निधीतून आवश्यक असणारे व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षण संच, हँड सँनिटायझर आणि इतर साहित्याची लवकरात-लवकर खरेदी करून मुंबईतील सर्व वैद्यकीय आस्थापना, जिल्हा प्रशासनाची सर्व कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करून संभाव्य परिस्थितीशी मुकाबला करण्याकरता सज्ज राहण्याचे आदेश अस्लम शेख यांनी दिले आहेत.

First Published on: March 31, 2020 3:45 PM
Exit mobile version