लठ्ठ लहान मुलांसाठी विशेष बाह्यरूग्ण विभाग

लठ्ठ लहान मुलांसाठी विशेष बाह्यरूग्ण विभाग

भाटिया हॉस्पिटलमध्ये विशेष बाह्यरूग्ण विभाग

भारतात लहान मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढत आहे. सर्वाधिक लठ्ठ मुलं असलेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. २०१८ मधील अभ्यासानुसार, भारतात साधारण ५.७४ ते ८.८२ टक्के शाळकरी मुलं स्थूल आहेत. लहान वयातील लठ्ठपणा ही फक्त शारीरिक समस्या नाही तर यामुळे वर्तवणुकीसंबंधी समस्या, डिप्रेशन येऊ शकतं आणि कोणी चिडवल्यास आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जाऊ शकतं. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये विशेष बाह्यरूग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या

अतिवजन किंवा स्थूल मुलांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार फार कमी वयातच बळावतात. बालपणीच स्थूलता असल्यास श्वास घेण्यास त्रास होणे,उच्च रक्तदाब, फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता, मासिक पाळी किंवा वयात येण्यासंदर्भातील समस्या आणि मानसिक परिणाम असे त्रास जाणवतात. त्यामुळे, अशा मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी या सर्व गोष्टी लवकर ओळखून त्यात वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबईतील भाटिया हॉस्पिटलने लठ्ठ लहान मुलांसाठी बाह्यरूग्ण विभाग सेवा आणि समुपदेशन सुरू केले आहे.

योग्य उपचार न मिळाल्यास स्थूल मुलांमध्ये भविष्यात मायोकार्डिअल इर्न्‍फाक्शन आणि स्ट्रोक यासारखे कार्डिओ-व्हॅस्क्युलर आजार उद्भवू शकतात. प्रत्येक मुलाप्रमाणे स्थूलतेचे उपचार बदलत जातात. पण, यात यश मिळण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातच उपचार सुरू होणे महत्त्वाचे आहे. शिवाय, कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लठ्ठ लहान मुलांसाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेवेत सध्या प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरूडे हे व्हिजिटिंग स्पेशालिस्ट आणि समुपदेशक आहेत.
डॉ. राजीव बोधनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, भाटिया हॉस्पिटल

First Published on: June 25, 2019 7:50 PM
Exit mobile version