पनवेल ते हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष ट्रेन

पनवेल ते हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष ट्रेन

पनवेल ते हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष ट्रेन

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा करत असते. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते हजूर साहिब नांदेड दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ०७३१३ ही रेल्वे विशेष पनवेल येथून १९ मार्च ते ०१ एप्रिल २०२१ दरम्यान दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार रोजी दुपारी ४.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ११.०० वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. ०७३१४ विशेष हजूर साहिब नांदेड येथून दि. १८ मार्च ते ३१ मार्च २०२१ दरम्यान दर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार रोजी दुपारी ५:३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १२.३० वाजता पनवेलला पोहोचेल.

ही रेल्वे कर्जत (केवळ ०७३१३ साठी), लोणावळा (केवळ ०७३१३ साठी), तळेगाव, चिंचवड, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा या स्थानकांवर थांबेल. यामध्ये एक वातानुकुलीत प्रथम श्रेणी सह वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, दोन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, १३ शयनयान आणि ४ द्वितीय श्रेणी आसन याची उपलब्धता असणार आहे.

संपूर्णपणे आरक्षित विशेष गाडी क्र. ०७३१३ साठी बुकिंग विशेष शुल्कसह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर दिनांक १८ मार्च २०२१ रोजी २.०० वाजता www.irctc.co.in या संकेतस्थळावर प्रारंभ होईल. उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करणे अनिवार्य आहे.


हेही वाचा – पोलीस महासंचालक संजय पांडे नाराज, लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र

First Published on: March 18, 2021 7:59 PM
Exit mobile version