रुग्णालये, दवाखाने, शौचालये आदी ठिकाणीच आता फवारणी

रुग्णालये, दवाखाने, शौचालये आदी ठिकाणीच आता फवारणी

जंतूनाशक फवारणी

मुंबईत सरसकट सुरु असलेल्या ‘सोडियम क्लोराईड’ मिसळून करण्यात येणाऱ्या फवारणीबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारची फवारणी कोणत्याही खासगी जागेत होणार नाही तर महापालिका निश्चित करेल तिथेच होईल, असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने फवारणीची सुनिश्चित कार्यपद्धती अर्थात ‘एसओपी’ बनवली आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालये, दवाखाने, शौचालये इत्यादी ठिकाणी फवारणी करण्यात येईल. शिवाय ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आले असेल, त्या सोसायटी किंवा घरामध्ये फवारणी करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक आणि नगरसेविकां यांची आयुक्तांच्या उपस्थित एक ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक पार पडली. यावेळी जंतूनाशक फवारणीबाबत अनेक नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करत ही फवारणी कितपत उपयुक्त आहे, असा असा सवाल केला. त्यावर मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

‘करोना कोविड १९’च्या पार्श्वभूमीवर ‘सोडियम हायपोक्लोराईट’ची फवारणी करण्याचा आग्रह धरणे चुकीचे असून या रसायनाचे दुष्परिणाम लक्षात घेता विनाकारण त्याची फवारणी करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सरसकट फवारणी करणे टाळावे. त्याचबरोबर एखाद्या परिसरात अशी फवारणी करणे सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) गरजेचे असल्यास त्याठिकाणी पालिकेच्या यंत्रणेद्वारेच फवारणी करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या बैठकीत केले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी देखील सरसकट फवारणीबाबत चिंता व्यक्त केली असून अशी फवारणी टाळण्याचे आणि फवारणी ही केवळ ठरलेल्या निकषांनुसारच करावी, असे निर्देश दिले असल्याचीही आठवण करून दिली. महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना नगरसेवकांनी अधिकाधिक सहकार्य करावे, महापौरांनी केले आहे.

चुकीच्या पद्धतीने फवारणी

दुर्देवाने काही ठिकाणी ही फवारणी काही व्यक्तींद्वारे स्वतःहून करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. कोणतीही तांत्रिक माहिती नसलेल्या किंवा सदर औषध किती प्रमाणात कुठे आणि कशामध्ये मिसळावे याविषयी कोणतीही माहिती नसलेल्या व्यक्तींद्वारे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने फवारणी करण्यात आल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम सदर परिसरातील नागरिकांना भोगावे लागू शकतात. त्यामुळे अशी फवारणी गरज असेल तिथे आणि संबंधित‌ महापालिकेच्या यंत्रणेद्वारेच करणे गरजेचे आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी आजच्या बैठकीत दरम्यान नमूद केले.

अशाप्रकारे होणार फवारणी

First Published on: March 31, 2020 10:32 PM
Exit mobile version