एसटीच्या आवडेल तिथे प्रवास योजनेकडे प्रवाशांची पाठ

एसटीच्या आवडेल तिथे प्रवास योजनेकडे प्रवाशांची पाठ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) प्रवाशांसाठी विविध योजना राबवल्या जातात. ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेला प्रवाशांनी यापूर्वी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र आता एसटीच्या या योजनेकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या वर्षी म्हणजे मार्च २०१७ ते मार्च १८ मध्ये २ लाख ४२ हजार पासेसची विक्री झाली होती. मात्र यावर्षी म्हणजे एप्रिल २०१८- मार्च २०१९ मध्ये २ लाख ४ हजार इतक्याच पासांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलने यावर्षी ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेचे ३८ हजार लाभार्थी कमी झाले आहेत. असे जरी असले तरी या योजनेत मिळणार्‍या महसूलात तब्बल दोन कोटींनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “आवडेल ते प्रवास” ही योजना सन १९८८ पासून प्रवाशांसाठी राबवित आहे. पूर्वी या योजनेच्या कालावधी १० दिवसांचा होता. २०१० नंतर १० दिवसांचे पास बंद करण्यात आले. त्याऐवजी या योजनेंतर्गत ७ दिवसांचा आणि ४ दिवसांचा पास दिला जातो़. प्रवाशांच्या गरजेप्रमणे या योजनेत वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. या पासेसमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जास्त गर्दीचा हंगाम हा १५ ऑक्टोबर ते १४ जून आणि दुसरा कमी गर्दीच्या हंगाम हा १५ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधी नुसार या आवडेल तेथे प्रवासाच्या पासेसची किंमती ठरविल्या आहेत.

सद्या ही सेवा साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती (मिडी), हिरकणी (निमआराम), शिवशाही व आंतरराज्यीय (साध्या,निमआराम व शिवशाही) बसेस्साठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये २१ कोटी रुपयांच्या महूसल मिळाला होता. मात्र २०१८ – १९ मध्ये २ लाख ४ हजार पासेची विक्री झाली आहे. त्याच्या माध्यमातून २३ कोटीच्या महसूल एसटी महामंडळानी गोळा केला आहेत. योजनेच्या लाभार्थींची संख्या जरी कमी झाली असली तरी महसूल वाढल्याने एसटी महामंडळ आनंदी आहे.

शिवशाही पासधारकांची संख्या वाढली
एसटीच्या शिवशाही बसेस्नाही ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेत सहभागी करून घेण्यात आले. शिवशाहीसाठी २०१७-१८ मध्ये ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेतून फक्त १२ हजार प्रवाशांनी पास काढले होते. तर २०१८-१९ मध्ये तब्बल ९६ हजार प्रवाशांनी शिवशाहीचा पास काढला आहे. म्हणजे गेल्या एका वर्षात ८४ हजार पासेस् एका वर्षात वाढले आहेत. ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेत शिवशाहीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत. ही बाब एसटीसाठी जमेची ठरत आहेत.

First Published on: July 21, 2019 4:41 AM
Exit mobile version