सेंट झेवियर्सचे ‘मल्हार’ १५ ऑगस्टपासून

सेंट झेवियर्सचे ‘मल्हार’ १५ ऑगस्टपासून

malhar conclave

कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या ‘मल्हार’ कॉन्क्लेव्ह १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तीन दिवस चालणार्‍या मल्हारमध्ये विद्यार्थ्यांसाठी पॅनल डिस्कशन, वादविवाद, वर्कशॉप व मान्यवरांसोबत चर्चा करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ कॉन्क्लेवला यावर्षी १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. १५ ते १७ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमामध्ये दरवर्षी पहिल्या दिवशी बौद्धिक चर्चेला प्राधान्य देण्यात येते. कॉन्क्लेवमध्ये प्रत्येक वर्षी सर्वात ऊर्जात्मक, विचार विस्मयकारक मुद्दे आणि वाद विवाद पहायला मिळतात. डॉ. रघुराम राजन, दलाई लामा, डॉ. शशि थरूर, अनुराग कश्यप सारख्या दिग्गजांनी आतापर्यंत कॉन्क्लेवला भेट दिली आहे. या सर्वांनी तरुण पिढीला प्रगतीच्या वाटेवर चालण्याचे प्रोत्साहन दिले आहे. ही परंपरा या वर्षीदेखील जपण्यात आली आहे.

यावर्षी विद्यार्थ्यांना जगातील सर्वात प्रभावशाली पत्रकारांपैकी एक असलेल्या सर विलियम मार्क टली, भारतातील अनेक नावाजलेल्या प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत करणार्‍या अरुंधती काटजू, आंतरराष्ट्रीय संबंध, इतिहास आणि रणनीतिक डॉ. श्रीनाथ राघवन यांच्याशी संवाद साधता येणार आहे. त्याचबरोबर पॅनल चर्चेमध्ये फ्लायवेट बॉक्स पिंकी जंगरा, भारतातील महिला क्रीडा स्पर्धेच्या संस्थापक वैदेही वैद्य, बॅडमिंटनपटू अर्पणा पोपट, टेबल टेनिसपटू सानिका दिवेकर, क्रीडा पत्रकार के. श्रीनिवास राव, केया आचार्य, गायक व संगीतकार राघव मेटेल याचबरोबर पृथ्वीला परिभ्रमण करणारी भारतातील पहिली महिला संघटना असलेल्या तारिणीमधील पराक्रमी महिला नौसैनिकांशी चर्चा करता येणार आहे.

First Published on: July 23, 2019 4:06 AM
Exit mobile version