राज्य अजिंक्यपद फुटसाल स्पर्धा

राज्य अजिंक्यपद फुटसाल स्पर्धा

मुंबई उपविजेते; पुणे अजिंक्य

पुण्याच्या संघाने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या १३ वर्षांखालील मुलांच्या महाराष्ट्र राज्य आजिंक्यपद फुटसाल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जिल्हा फुटसाल असोसिएशन आणि महाराष्ट्र फुटसाल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई शहर संघावर ३-१ अशी मात केली. या स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या आधारे पुढील महिन्यात होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी १६ संभाव्य खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली.

या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, महाराष्ट्र फुटसाल असोसिएशनचे सचिव सुनील पूर्णपात्रे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, फुटसाल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शिरगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाना पदके, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेच्या आधारे निवडण्यात आलेला महाराष्ट्राचा संघ –
आर्यन करकेरा, प्रणय चिरानी, सिद्धांत मलिक, अनिश वर्मा, अर्णव लुंकड, अझीज बागजी, भौमिक कुमार, अनुज पाटील, सत्यजित काळे (मुंबई), ऍड्रिन जॉर्ज, क्राईस्ट डिसुझा, राहुल शर्मा, रणवीर पाटील, केल्विन अँड्रीझ, अर्णव मलिक.

First Published on: August 8, 2019 4:01 AM
Exit mobile version