काँग्रेसचा दोन मतदानावरील आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला

काँग्रेसचा दोन मतदानावरील आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजप आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आपला निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा दिलासा तर निवडणूक निकालापूर्वीच काँग्रेसला झटका बसला आहे.

काँग्रेसचा काय होता आक्षेप – 

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर राज्य निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. टिकळ आणि जगताप यांनी आपली मतपत्रिका स्वत: मतपेटीत न टाकता सहकाऱ्यांचा वापर केला. हा गोपनीय मतदानचा भंग असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार –

राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळल्यानंतर काँग्रेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे मत मोजीणी प्रक्रियेला विलंब लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार – 

काँग्रेसनं मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. आता लक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. अशावेळी काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळतेय.

 

First Published on: June 20, 2022 5:31 PM
Exit mobile version