Corona: जनतेच्या मदतीसाठी काँग्रेसची राज्यस्तरीय २४ तास हेल्पलाईन सेवा

Corona: जनतेच्या मदतीसाठी काँग्रेसची राज्यस्तरीय २४ तास हेल्पलाईन सेवा

हितगुज हेल्पलाईन

राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, आता वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी काँग्रेसने 24 x 7 हेल्पलाईन कक्ष सुरू केला आहे. यशोधन या संगमनेर येथील कार्यालयात स्वतंत्र 24 x 7 आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

हेही वाचा – देशवासियांनो हा आठवडा कोरोनाचे भविष्य सांगणार

म्हणून हेल्पलाईन सेवा सुरू

कोरोना रोखण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून संगमनेर येथील यशोधन संपर्क कार्यालयात राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये २४ तास मदत केली जाणार आहे. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू न मिळणे, जादा दराने विक्री व उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक समस्या या बाबतच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. अशा कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच तातडीने मदत या गरजू नागरिकांना मिळावी याकरता मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ही आपत्कालीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यशोधन कार्यालय हे संगमनेर तालुका आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठे मदतीचे केंद्र ठरले असून नागरिकांना मागील ७ वर्षात २४ तास मदत मिळत आहे. कोरोनाच्या या काळामध्ये नागरिकांचे प्रश्‍न नोंदवून घेतले जाणार असून त्या प्रश्नांची योग्य विभागामार्फत सोडवणूक केली जाणार आहे.

सोशल डिस्टन्शिंग हाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे घरातच राहा सुरक्षित राहा. तुम्हाला काही मदत हवी असल्यास आमच्या हेल्पलाईन वर एक फोन करा. काँग्रेस कार्यकर्ते आपल्या मदतीला तत्पर आहेत. तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेऊन १० हजार पिशव्या रक्त जमा केल्या जाणार आहेत.
– बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री

या क्रमांकावर संपर्क साधा

काँग्रेसची ही हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू असून याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 02425 – 227303,227304 व 9689304304, 9689113983 या क्रमांकावर तसेच व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून 9527037037 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काँग्रेसची हेल्पालाईन सेवा
First Published on: April 1, 2020 5:30 PM
Exit mobile version