एलटीटी चोरीच्या घटनेचा पोलिसांकडून छडा

एलटीटी चोरीच्या घटनेचा पोलिसांकडून छडा

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयात झालेल्या 44 लाखांच्या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात कुर्ला लोहमार्ग पोलिसांना यश आले आहेत. या चोरीच्या गुन्हातील चार आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 44 लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयातून 21 सप्टेंबर रोजी जमा झालेली 44 लाख 29 हजार रुपयांची रोकड दुसर्‍याच दिवशी तिजोरीतून चोरीला गेली होती. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी समीर वसंत ताराबडकर आणि कुमार भूमीनाथ पिल्लई असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोघेही रेल्वेचे अधिकारी असून दोघांवर तिकीट आरक्षण कार्यालयाची जमा होणार्‍या रकमेच्या जबाबदारीचे काम होते. समीर हा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणारा असून पिल्लई मुंबईतील जीटीबी नगर येथे राहणारा आहे. या दोघांची कसून चौकशी केली जाताना त्यांनी आणखी दोघा आरोपींची नावे त्यांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मोरेश्वर कदम आणि अजित देशमुख या दोघांना अटक केली आहे.

मोरेश्वर हा रेल्वे कर्मचारी असून अजित हा खासगी व्यक्ती आहे. ताराबडकर आणि पिल्लई यांनी ही रक्कम चोरी करून मोरेश्वरकडे दिली होती. मोरेश्वरने ही रक्कम लपवण्यासाठी कोपरखैरणे येथे राहणार्‍या अजित याच्याकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी अजितच्या घरातून चोरी गेलेली 44 लाख रुपयाची रक्कम हस्तगत केली आहे. या चारही आरोपींना पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहेत. तसेच रेल्वे सेवेतून सुध्दा निलंबित करण्यात आले आहेत.

First Published on: October 1, 2019 5:44 AM
Exit mobile version