नराधम बापाला कडक शासन करा

नराधम बापाला कडक शासन करा

बापानेच मुलीवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना दिंडोरी तालुक्यातील वाघदेव पाडा येथे घडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच संतापाची लाट उसळली आहे. बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे, असा दुर्दैवी प्रकार पुन्हा घडू नये यासाठी संशयित आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी वणी ग्रामस्थांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

अल्पवयीन पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा करण्यात आला आहे. वाघदेव पाडा येथे सन २०१९ मध्ये होळीच्या सुट्टीत व दि. २० जून रोजी दुपारी साडे बाराच्या दरम्यान बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. होळीच्या सुट्टीत संबंधित अल्पवयीन मुलगी घरी आली होती. तेव्हा एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने बलात्कार केला होता व आताही २० जून रोजी शेतातील शिवारात एकटी असताना बलात्कार केला.
हा प्रकार बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी या नराधम बापाला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. यासंदर्भात वणी ग्रामस्थांनी वणी पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपूत यांना मीना पठाण, सविता सोमवंशी, बंटी सैय्यद, मनोज थोरात, दिगंबर पाटोळे, अरविंद क्षिरसागर यांनी वणी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले.

First Published on: June 25, 2021 1:00 AM
Exit mobile version