सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

रस्सीखेच स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

रस्सीखेच स्पर्धे दरम्यान एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. विद्याविहार येथील के. जे सोमय्या कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. कॉलेजमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी रस्सीखेच स्पर्धा ठेवण्यात आली होती. यादरम्यान हा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे. जीबीन सनी या २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रस्सीखेच खेळ सुरु असताना अचानक जीबीन सनी बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषीत करण्यात आलं.

स्पर्धेदरम्यान तो जमिनीवर पडला

मिळालेल्या माहितीनुसार, सोमय्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे निमित्त रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. खेळासाठी दोन गट करण्यात आले होते. २२ वर्षीय जीबीन सनी देखील या खेळात सहभागी झाला होता. व्हिडीओत जीबीन सनी सर्वात पुढे उभा असल्याचं दिसत आहे. पूर्ण जोर लावून तो रशी ओढताना दिसत आहे. जोर देण्यासाठी ती रशी तो गळ्याभोवती घेताना दिसतोय. उपस्थित विद्यार्थिही चिअर्स करताना दिसत आहेत. मात्र थोड्याच वेळात जिबीन सनी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो.

पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवला

जीबीनी सनीला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आलं. जीबीन सनी नर्सिंगचा विद्यार्थी होता अशी माहिती मिळत आहे. डिहायड्रेशन किंवा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह नेण्यात आला असून त्यानंतर जीबीनीच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल. जीबीन हा माजगाव येथील रहिवासी होता आणि नर्सिंगचे शिक्षण घेत होता.

First Published on: December 14, 2018 5:50 PM
Exit mobile version