दहावी बारावी ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थांचे शिवाजी पार्कात ठिय्या आंदोलन

दहावी बारावी ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थांचे शिवाजी पार्कात ठिय्या आंदोलन

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थांना घरूनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु आता दहावी बारावीच्या परीक्षांना काही दिवस उऱलेले असतानाच एक नवा वाद उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीच्या परीक्षांची घोषणा ही ऑफलाईन पद्धतीने करण्यात आली होती. पण या ऑफलाईन परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांचा विरोध उफाळून आलेला आज शुक्रवारी शिवाजी पार्क येथे दिसून आले. वर्षभर शिक्षण ऑनलाईन दिले, मग आता ऑफलाईन परीक्षा कशासाठी असा संतप्त सवाल करत दादर शिवाजी पार्क येथे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी जमले होते. याठिकाणी विद्यार्थ्यांकडून ठिय्या आंदोलनही करण्यात आले.

आता दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय समजल्यावर अनेक विद्यार्थी संताप व्यक्त केला आहे. ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुंबईत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेना भवना येथे जाण्यापासून रोखल्यामुळे शिवाजी पार्क येथेच या विद्यार्थ्यांनी आज आंदोलनाला सुरुवात केली. जमावबंदीच्या आदेशामुळे शिवाजी पार्क येथे आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थांना पोलिसांनी तेथून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आम्ही शिक्षण वर्षभर ऑनलाईन घेतले मग बोर्डाची परीक्षा ऑफलाईन का? असे संतप्त झालेले दहावी बारावीचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे परीक्षा ऑनलाईनच घ्यावी अशी विद्यार्थांची मागणी आहे. यामुळे शिवाजी पार्क येथे मुंबईतील दहावी बारावीचे असंख्य विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. गर्दी करु नका असे पोलिसांनी सांगितले असतानाही संतप्त झालेले विद्यार्थ्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला. अनेक दिवसांपासून विद्यार्थांच्या मनात परीक्षेबाबत अनेक प्रश्न होते. पण आता परीक्षा ह्या ऑफलाइन घेण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या निर्णय़ावर नाराजी व्यक्त केली आहे. जसं ऑनलाइन शिक्षण होतं, तशा परीक्षा ही ऑनलाइनच घ्यावी, अशी एकच मागणी या विद्यार्थांची आहे.


हे वाचा- सोमय्यांविरोधात वायकरांनी दाखल केला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

First Published on: April 2, 2021 4:22 PM
Exit mobile version