आर्यभट्ट गणित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

आर्यभट्ट गणित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी त्यांना गणिताचा आनंद घ्यावा यासाठी सीबीएसई बोर्डाकडून आर्यभट्ट गणित स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील 5 हजार 457 शाळांतून तब्बल 7 लाख 71 हजार 214 विद्यार्थी बसले आहेत.

21 व्या शतकामध्ये गणितातील आव्हानांचा सामना विद्यार्थ्यांना करता यावा तसेच गणिताचा अभ्यास करण्यात त्यांना रूची निर्माण व्हावी या उद्देशाने आर्यभट्ट गणित स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. सीबीएसई बोर्डाकडून ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार असून, या स्पर्धेला सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या 5 हजार 457 शाळांमधील 7 लाख 71 हजार 214 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ही स्पर्धा 18 ते 22 नोव्हेंबरदरम्यान चालणार आहे. पहिल्या टप्प्यात होणार्‍या स्पर्धेत प्रत्येक शाळेतून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन विद्यार्थ्यांची निवड दुसर्‍या टप्प्यासाठी होणार आहे. दुसरा टप्पा 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा संगणकावर घेण्यात येणार असल्याची माहिती सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आली.

First Published on: November 20, 2019 2:30 AM
Exit mobile version