विद्यार्थ्यांनी बांधल्या रिक्षाचालक आणि कामगार महिलांना राख्या

विद्यार्थ्यांनी बांधल्या रिक्षाचालक आणि कामगार महिलांना राख्या

रिक्षाचालक महिलेला राखी बांधणारे विद्यार्थी

मुलं लहान असतानाच त्यांच्यावर महिलांचा आदर करण्याचे संस्कार व्हायला हवेत. सध्याची भारताची परिस्थिती पाहता आजच्या काळात ते फार गरजेचे आहे. या गोष्टीची मुलांना शिकवण मिळावी. यासाठी मुलुंडच्या रिचमंड इंटरनॅशनल शाळेने एक आगळावेगळा उपक्रम केला आहे. या शाळेने वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन सण साजरा केला आहे. शाळेतल्या लहान मुलांनी स्वतः बनवलेल्या राख्या महिला रिक्षाचालक, महिला पोलीस, महिला सुरक्षा रक्षक आणि महिला अग्निशमन दल आणि सफाई कामगारांना राख्या बाधल्या.

कामाचा केला सन्मान

रक्षणकर्ता वेगळ्या रूपात म्हणजे स्त्री सुद्धा असू शकते, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला आहे. स्त्रियादेखील पुरूषांप्रमाणे मेहनतीची कामे करतात. रिक्षा चालवतात, पोलिसाचे काम करतात, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल तसेच सफाईचे कामदेखील करतात. अशा महिलांच्या आणि त्यांच्या कामाचा सन्माल व्हायला हवा. लहान मुलांवर अत्तापासून याचे संस्कार व्हायला हवेत.

First Published on: August 26, 2018 12:49 PM
Exit mobile version