न चाललेली मुलगी १३ वर्षांनंतर राहिली स्वतःच्या पायावर उभी

न चाललेली मुलगी १३ वर्षांनंतर राहिली स्वतःच्या पायावर उभी

लिबेरियन देशात जन्मापासून राहणाऱ्या एका २० वर्षीय मुलीवर मुंबईत तिला असणाऱ्या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. २० वर्षीय नुइकर वर्तेकाई ७ वर्षांची असल्‍यापासून नीट चालू शकत नव्हती. तिला सतत कंबर आणि गुडघ्‍यांमध्‍ये वेदना जाणवत होत्‍या. नुइकरच्या आई-वडिलांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे ही दाखवले. पण, तिला असलेल्या आजाराचं योग्य निदानच होत नव्हतं. त्यानंतर, तिच्या आई-वडिलांनी तिला मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ती मुंबईतील मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्‍ये दाखल झाली.

यशस्वी उपचारानंतर मुलगी स्वतःच्या पायावर चालली 

मुलुंडच्या डॉक्टरांनी तिच्या काही तपासण्या केल्यानंतर तिला अंतिम टप्प्यात असलेल्‍या संधिवाताचं निदान झालं आणि सांध्‍यांची देखील झीज झाली होती. त्यामुळे, तिला खूप कमी वयातच सिरॅमिक कोटेड कृत्रिम सांध्यांसह उजव्‍या बाजूची कंबर आणि डाव्‍या गुडघ्‍याचे रिप्‍लेसमेंट करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर काही वेळाने तिच्यावर एकाच टप्प्यात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही काळ तिच्यावर फिजिओथेरपी देखील करण्यात आली. या उपचारांचा तिच्यावर सकारात्मक उपचार पाहायला मिळाला आणि त्यामुळे एका आठवड्यानंतर दिलेल्या डिस्चार्जदरम्यान ती एवढ्या वर्षात पहिल्यांदाच कोणत्याही सपोर्टशिवाय चालली.


हेही वाचा- चक्क विमानातून येऊन घरफोड्या करायचा ‘हा’ हाय-फाय चोर!

याविषयी बोलताना फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्‍ठ सल्‍लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सचिन भोसले यांनी सांगितलं की, ” वर्तेकाई वयाच्या ७ वर्षांपासून चालू शकत नव्‍हती. स्‍थानिक डॉक्‍टर तिच्‍या आजाराचं योग्य निदान करु शकले नव्हते. त्यामुळे तिचे आई-वडील तिला इथे घेऊन आले. तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ती पहिल्‍यांदा न लंगडता चालली तेव्‍हा तिला खूप आनंद झाला. तिला अवजड कृती न करण्‍याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्‍यामुळे तिच्‍या सांध्‍यांचे कार्य दीर्घकाळापर्यंत उत्तम राहिल. “

First Published on: August 21, 2019 9:07 PM
Exit mobile version