Sushant Sucide Case: रिया चक्रवर्तीच्या जीवाला धोका!

Sushant Sucide Case: रिया चक्रवर्तीच्या जीवाला धोका!

रिया चक्रवर्ती

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिस मुंबईत तपासासाठी आले आहेत. आता या प्रकरणामध्ये बिहारमधील सत्ताधारी पक्ष असणारा जनता दल यूनायटेडने उघडपणे मतप्रदर्शन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी जेडीयूच्या प्रवक्त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा दिशा सालियनच्या ‘हत्ये’शी संबंध असल्याचे दिसत आहे, असे म्हटले आहे. तसेच हे सगळं घडवून आणणारे लोकं स्वत:ला वाचवण्यासाठी रिया चक्रवर्तीची हत्याही करु शकतात, त्यामुळे रियाच्या जीवाला धोका असण्याची शक्यता जेडीयूच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी आपले या संदर्भातील मत मांडले आहे.

एकत्रितपणे तपास करण्याची मागणी

“दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये एक साम्य म्हणजे रिया चक्रवर्ती. काही महत्वाच्या लोकांच्या सांगण्यावरुन रिया चक्रवर्तीची हत्याही केली जाऊ शकते. रियाने पोलीस संरक्षण घ्यायला हवं, कारण रिया या प्रकरणामध्ये संशयित आहे आणि मुख्य साक्षीदारही आहे. तिने न्यायालयाकडे स्वत:च्या सुरक्षेसाठी तिने मागणी करायला हवी,” असंही रंजन म्हणाले आहेत. या प्रकरणाकडे तुकड्या तुकड्यांमध्ये न बघता तपास यंत्रणांनी याचा एकत्रितपणे तपास करावा, अशी मागणीही रंजन यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या कामाच्या पद्धतीवर रंजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्याय देण्याच्या विचारानुसार या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काम केलं पाहिजे, असं रंजन म्हणाले आहेत. “मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे सुपूर्द करावे. या प्रकरणाचा पुढील तपास बिहार पोलिसांनी करावा,” अशी मागणी रंजन यांनी केली आहे.

दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूचा संबंध?

“मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या आत्महत्याप्रकरण सध्या मागे घेतले आहे. तर दुसरीकडे ते आता सुशांत सिंह प्रकरणामध्येही ते योग्यपणे चौकशी करत नसल्याचे दिसून येत आहे. ४५ दिवसांनंतरही या प्रकरणामधील बराचसा तपशील पोलिसांनी गोळा केलेला नाही हे ही लक्षात घ्यायला हवं,” असं रंजन म्हणाले. तर दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत दोघांच्या मृत्यूचा काहीतरी संबंध असल्याची शक्यता रंजन यांनी व्यक्त केली आहे.


Sushant Sucide Case : रिया कुटुंबियांसह पसार? पण तीचे वकिल म्हणतात…!

First Published on: August 4, 2020 11:13 AM
Exit mobile version