सुशांतच्या आत्महत्येचा उत्सव करणाऱ्यांना संजय राऊतांच्या कानपिचक्या

सुशांतच्या आत्महत्येचा उत्सव करणाऱ्यांना संजय राऊतांच्या कानपिचक्या

खासदार संजय राऊत

संजय राऊत यांनी दै. ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे. त्यांनी सुशांतच्या आत्महत्येचा उत्सव करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. संजय राऊत यांचे ‘ठाकरे’ चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचे ठरले. जार्ज यांची भूमिका करणारे चेहरे म्हणून ज्या दोन-तीन अभिनेत्यांची नावे समोर आली त्यात सुशांतचे नाव होते. धोनीवरील बायोपिकमुळे तो माझ्या नजरेत होता. तो उत्तम अभिनेता आहे, ही भूमिका लिलया पेलेल, असे मला सांगणयात आले. पण त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. सेटवर त्याचे वर्तन तऱ्हेवाईक आहे. त्याचा त्रास सगळ्यांना होतो. अनेक प्रॉडक्शन हाऊसने याच कारणामुळे त्याच्याशी असलेले करार मोडले. सुशांतने स्वत:च स्वत:च्या करिअरची वाट लावली, असे या जाणकारांचे सांगणे होते. त्यानंतर दोन महिन्यातच त्याच्या आत्महत्येची बातमी आली, असे सांगतानाच सुशांतने आत्महत्या केल्याने पडद्यावरचा ‘संभाव्य जॉर्ज’ गेला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

सुशांतची आत्महत्या हे उत्सवाचे एक निमित्त आहे. त्याच्या बायकांशी असलेल्या अनेक भानगडी (ब्रेकअप) हाच उत्सवी गुऱ्हाळाचा बिंदू आहे, असं सांगतानाच सुशांतच्या आत्महत्येला महिना होत आला तरी प्रसिद्धी माध्यमे त्यावर रकाने भरत आहेत. लॉकडाऊनमुळे चूल कायमची विझली म्हणून पुण्यात पत्नी आणि दोन मुलासह अतुल शिंदे या तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची फाइल बंद झाली. सुशांतच्या आत्महत्येचा उत्सव होता, पण त्यात शिंद्यांना स्थान नाही, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –

Vidoe : NASA ने केले १० वर्ष सूर्याचे निरिक्षण; बघा ‘कसा’ बदलला सूर्य!

First Published on: June 28, 2020 5:14 PM
Exit mobile version