मनसेच्या दणक्यानंतर टी सीरिजचा माफिनामा; युट्यूबवरून हटवले आतिफ अस्लमचे गाणे

मनसेच्या दणक्यानंतर टी सीरिजचा माफिनामा; युट्यूबवरून हटवले आतिफ अस्लमचे गाणे

मनसेच्या दणक्यानंतर ‘टी’सीरीजने पाकिस्तानी गायक आतिफ असलम यानं गायिलेले ‘किंना सोना’ हे T-Series कंपनीच्या यू-ट्यूब चॅनेलवरून काढून टाकले आहे. तसेच तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात येणार नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच “हे गाणं आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केले होतं. त्याला माहिती नसल्याने ही चूक झाली. याबद्दल आम्ही माफी मागतो आणि यापुढे हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही अशी खात्री देतो असे टी सीरीजने आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘टी-सिरीज’ने जाहीर माफी मागितली आहे.

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचे गाण युट्यूबला अपलोड केल्यानंतर अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून गाणे तात्काळ हटवण्याची मागणी करत टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांना इशारा दिला होता. “भूषण कुमार तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल,” अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी इशारा दिला होता. मात्र या इशाऱ्यानंतर अखेर ते गाणे काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी देशातील सर्व म्युझिक कंपन्यांना पत्र लिहिले होते. पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकारांसोबत काम करायचे नाही, असा इशारा मनसेने या पत्रातून दिला होता.

हेही वाचा –

COVID-19 च्या उपचारासाठी असेलेल्या औषधाची ‘ही’ आहे किंमत!

First Published on: June 24, 2020 8:07 PM
Exit mobile version