एका क्लिकवर रेल्वे तिकीट काढा….

एका क्लिकवर रेल्वे तिकीट काढा….

रेल्वे प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. आता मध्य रेल्वेने एक नवीन प्रयोग केला आहे. जुन्या एटीव्हीएम मशीनला हॉट की बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर प्रवाशांना रेल्वे तिकीट काढता येणार आहे. पहिल्या टप्यात मुंबईसह उपनगरातील रेल्वे स्थानकांवर अशा 92 हायटेक एटीव्हीएम मशीन बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

उपनगरीय रेल्वेचे तिकीट खिडक्यांवरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एटीव्हीएम मशीन आणल्या होत्या.या मशीनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र एटीव्हीएम यंत्रावरुन तिकीट काढण्याची प्रक्रिया किचकट आहे. ती सोपी व्हावी, प्रवाशांना एका क्लिकवर तिकीट काढता यावे, यासाठी मध्य रेल्वेकडून गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. अखेर मध्य रेल्वेला त्यात यश आले आहे. जुन्या एटीव्हीएम मशीनवर ‘हॉट की’ बसवण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या एटीव्हीएम यंत्राच्या तुलनेत ही नवीन यंत्रे अधिक सोपी आणि फायदाची ठरणार आहेत. येत्या दोन दिवसांत मध्य रेल्वेवर हॉट की एटीव्हीएम यंत्रणा असणारी एटीव्हीएम मशीन बसविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या एकूण 42 स्थानकांवर 92 मशीन बसविण्यात येणार आहेत. या एटीव्हीएमवर तिकीट काढण्यासाठी जाणार्‍या प्रवाशांना तिकीट मिळण्यासाठी सहा वेळा निरनिराळे पर्याय निवडावे लागतात. त्याऐवजी नव्या मशीनमध्ये केवळ एकच पर्यायातच तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अशी असणार मशीन
या नव्या एटीव्हीएम मशीनमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. एकच तिकीट दर असणार्‍या सर्व स्टेशनांची यादी एकाच ठिकाणी येणार आहे. प्रवाशांनी एटीव्हीएमचे स्मार्ट कार्ड मशीनजवळ ठेवताच फक्त इच्छुक स्टेशनवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर प्रवाशांना जलद गतीने तिकीट मिळणार आहे. जुन्या एटीव्हीएम मशीनमध्ये तिकीट काढण्यची प्रक्रिया किचकट होती. कार्ड ठेऊन तिकीट हातात पडेपर्यंत सहा प्रक्रिया पार पाडाव्या लागत होत्या. आता केवळ एकाच क्लिकवर तिकीट मिळणार आहे.

एटीव्हीएम मशीनच्या माध्यमातून प्रवाशांना एका क्लिकवर तिकीट काढता यावे म्हणून येत्या दोन दिवसांत मध्य रेल्वेच्या 42 स्थानकावर 92 एटीव्हीएम मशीन बसविण्यात येणार आहेत.या एटीव्हीएम मशीनवर ‘हॉट की’ बसवल्यामुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होणार आहेत.
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

First Published on: October 23, 2019 6:41 AM
Exit mobile version