प्रवेशापूर्वी कोर्सची सर्व माहिती घ्या

प्रवेशापूर्वी कोर्सची सर्व माहिती घ्या

रुईया कॉलेजच्या प्रा. डॉ. अनुश्री लोकुर

प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थी व पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी सर्व कोर्सची माहिती घेऊन त्यानंतरच प्रवेश अर्ज भरावा. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेशासाठी फोर्स करू नये असा सल्ला रुईया कॉलेजच्या प्रा. डॉ. अनुश्री लोकुर यांनी दिला

सध्या विद्यार्थ्यांच्या बदलत्या कल बाबत काय सांगाल
– विद्यार्थ्यांसाठी सध्या करियरमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पूर्वी इंजिनियरींग व मेडिकलला विद्यार्थ्यांचे प्राधान्य असायचे, परंतु इंजिनियरींग व मेडिकलची प्रवेशप्रक्रिया कठीण झाल्याने व आर्ट्स, सायन्स या शाखांतून अनेक चांगले पर्याय उपलब्ध असून, आपण अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो हे विद्यार्थ्यांना समजू लागले आहे. सायन्स व आर्ट्स शाखेला प्रवेश घेतल्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारी करता येते. त्यामुळे आता विद्यार्थी इंजिनियरींग व मेडिकलच्या तुलनेत आर्ट्स व सायन्ससारख्या पारंपरिक विषयांकडे पुन्हा वळू लागली आहेत.

प्रवेशप्रक्रियेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी
– प्रवेशप्रक्रियेचा अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सर्व माहिती व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. अकरावीमध्ये प्रवेश घेताना एक फॉर्म भरावा लागतो. पण पदवीसाठी प्रवेश घेताना प्रथम मुंबई विद्यापीठाचा नोंदणी अर्ज व त्यानंतर विविध कॉलेजांचा स्वतंत्र अर्ज भरावा लागतो. विद्यापीठाकडे नोंदणी केल्यानंतर कॉलेजचे अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी सूचना व्यवस्थित वाचाव्यात. तसेच ज्या कॉलेजमध्ये अर्ज करायचा आहे. त्यांचा फॉर्म व्यवस्थित वाचून सर्व मार्क्स व्यवस्थित भराव. चुका टाळल्यास मेरीट लिस्टमध्ये अडथळे येत नाहीत. जे कोर्सेस करायेच आहे त्यांची माहिती घेऊन चॉईस भरताना विचारपूर्वक भरावेत किंवा काऊन्सिलिंगला येताना काही वाचून किंवा विचार करून यावा.

विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी समुपदेशकाची मदत घ्यावी का?
– हो, कारण अनेकदा विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती गोंधळलेली असते. त्यांना अभ्यासक्रम माहित असले तरी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा याबाबत स्पष्टता नसते. अनेकदा मित्र एखाद्या शाखेला प्रवेश घेत आहे म्हणून आपणही घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मानसिकता असते. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी सर्व विषयांची सविस्तर माहिती घ्यावी, तसेच त्याबाबत समुपदेशकांशी चर्चा करून नंतर विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मित्र प्रवेश घेतो म्हणून आपण घेऊ नये. त्याऐवजी आपला कल कोठे आहे, आपल्याला काय जमू शकते, कोणते विषय आवडते याची माहिती घ्यावी, लोकांशी बोलावे माहिती घ्यावी, पुढे काय करता येऊ शकते. त्यानंतरच नोंदणी करावी. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचण येऊ नये यासाठी आम्ही रुईया कॉलेजमध्ये दरवर्षी काऊन्सिलिंग फेस्ट ठेवतो. त्यामध्ये करियर मार्गदर्शनाबरोबरच व्होकेशन कोर्स, अनएडेड कॉलेज म्हणजे काय, त्यांची माहिती देण्यात येते. ही माहिती देण्यासाठी सकाळच्या सत्रात दोन समुपदेशन नियुक्त केले आहे. ज्या विद्यार्थ्याला समुपदेशनची गरज असेल त्यांनी याला नक्की भेट द्यावी.

स्वायत्त कॉलेजमध्ये कशाप्रकारे अभ्यासक्रम असतात
– नॅकमध्ये चांगला दर्जा असलेल्या कॉलेजांना स्वायत्तता मिळाली आहे. त्यांना अभ्यासक्रम ठरवण्याची मुभा असल्याने त्यांचा अभ्यासक्रम लवकर बदलू शकतो. त्यामुळे कॉलेजमध्ये नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जाते. अ‍ॅडिशनल स्किल बेस, कंटेम्परीरी या विषयातील सर्टिफिकेट कोर्सेस कोर्स असतात. वेगवेगळे अभ्यासक्रम किंवा विषयातील कौशल्य वाढवणारे कोर्सेस स्वायत्त कॉलेजांमध्ये असतात. अभ्यास्रक्रमाच्या पलिकडे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, सर्व परिस्थितीचा मानसिकदृष्ट्या सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात येतो. याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात फायदा होतो. त्याचप्रमाणे परीक्षेच निकाल वेळेवर लागत असल्याने त्यांना परदेशात व अन्य शिक्षणासाठी येणार्‍या अडचणींचा सामना करावा लागत नाही.

प्रवेशाबाबत पालकांना काय सल्ला द्याल
– विद्यार्थ्यांना कोणतेही प्रवेश घेण्यासाठी फोर्स करू नका. त्यांना तो कोर्स आवडला नाही तर त्यांना झेपणार नाही. त्यामुळे त्यांचा कल बघून त्यांना काय जमेला हे बझून त्यांना जे करायचे तते करायला मदत करा त्यांच्या मागे उभे राहा. पालकांनी नवीन कोर्सेस समजून घ्या, काय करता येईल, कॉलेजमध्ये नअके गोष्टी असता, त्यातील आपल्या मुलांना काय करता येईल हे बघणे गरजेचे आहे.

First Published on: June 6, 2019 4:29 AM
Exit mobile version