उन्हाळ्यात प्राण्यांची घ्या काळजी

उन्हाळ्यात प्राण्यांची घ्या काळजी

वातावरणात होणाऱ्या तापमान वाढीचा त्रास मनुष्यासह पक्षी, प्राण्यांनाही होत आहे. थोडंसं चाललं तरी आपल्याला धाप लागते. मार्च महिन्यापासून यंदा तापमान वाढीत कमालीची भर झाली आहे. आपल्यालाच एवढा त्रास होत आहे तर प्राणी-पक्षांना या रखरखत्या उन्हाचा किती त्रास होत असेल यामुळेच पक्षी आणि प्राणी आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाचे चटके बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचं जीवनमान धोक्यात आलं आहे. उन्हामुळे सर्वात जास्त मनुष्याप्रमाणे पक्षांनाही डिहायड्रेशनचा त्रास होतो. बऱ्याचदा या त्रासामुळे पक्षी आकाशात संचार करत असताना रस्त्यावर येऊन पडतात. तर, कुठे झाडांच्या फाद्यांवर अडकतात. विजेच्या तारांनाही अडकून राहतात. यातूनच त्यांचा जीव जाण्याच्या घटना घडतात.

मुंबईतील परळच्या पशू वैद्यकीय रुग्णालयात मार्च महिन्यापासून आतापर्यंत ९० हून अधिक प्राणी आणि पक्ष्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. यात २० ते २२ पक्षी असून कबुतरांचे प्रमाण ७० टक्के आणि उर्वरित पक्ष्यांचं प्रमाण ३० टक्के आहे. याशिवाय, सध्या २० ते २५ श्वानांवर उपचार सुरू असून ३० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २० मांजरांवर सध्या उपचार सुरू आहेत.

तर, याविषयी बैलघोडा हॉस्पिटलचे सचिव डॉ. जे.सी. खन्ना यांनी सांगितलं की, ” मार्च ते एप्रिलपासून आतापर्यंत ९० हून अधिक प्राणी आणि पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलं आहे. यात २० ते २२ पक्षी असून कबुतरांचे प्रमाण ७० टक्के आणि उर्वरित पक्ष्यांचं प्रमाण ३० टक्के आहे. याशिवाय, सध्या २० ते २५ श्वानांवर उपचार सुरू असून ३० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, २० मांजरांवर सध्या उपचार सुरू आहेत.

पक्ष्यांसाठी काय कराल ?

उन्हाळ्यात मटण किंवा चिकनसारखे गरम खाद्यपदार्थ म्हणून देऊ नयेत

घर किंवा इमारतीवर पाण्याची भांडी भरून ठेवावीत.

पाण्यात ग्लुकोज टाकल्यानं पक्ष्यांसाठी फायदेशीर ठरेल.

पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत

उन्हाळ्यात पक्ष्यांची घरटं तोडू नका.

कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावीत

पक्षांना खाऊ म्हणून दाणे ठेवावेत. तेलकट पदार्थ टाळावेत.

First Published on: April 18, 2019 8:06 PM
Exit mobile version