तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; २ जण जखमी

तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; २ जण जखमी

आग प्रातिनिधिक छायाचित्र

तळोजा एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास येथील एका कंपनीला अचानक आग लागून भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २ दोन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. अचानक स्फोट झाल्याने आसपासच्या संपूर्ण परिसराला हादरे बसले. सदर आगीचा भडका प्रचंड मोठा आहे. स्फोट झाल्यानंतर आसपासच्या परिसरातल्या अनेक गावांना भूकंपासारखा हादरा बसल्याचं देखील सांगितलं जात आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा असल्याने ही आग पसरू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान सातत्याने या आगीवर पाण्याचा मारा करत आहेत. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट कशामुळे झाला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत भीषण स्फोट झाला. स्फोटात या ठिकाणी काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झालेत. सकाळी साडे दहाच्या दरम्यान हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामुळे एक किलोमीटर परिसरातील किरवली, रोहिंजण आणि धानसर या गावांना हादरे जाणवले. कचर्‍यामध्ये आलेल्या काही रसायनांच्या ड्रमला फावड्याचा फटका लागल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीत पनवेल महानगरपालिका आणि तळोजा एमआयडीसी परिसरातील कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. त्याच कचर्‍यात हा रसायनांचा ड्रम आल्याची शक्यता आहे. तळोजा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. जखमी झालेले दोन्ही कामगार जेसीबी चालवणारे होते. स्फोटाची तीव्रता इतकी होती की कल्याणजवळच्या १४ गावांमध्ये या स्फोटाचे हादरे जाणवले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

First Published on: October 29, 2018 11:11 AM
Exit mobile version