बिग बॉसमध्ये कोण करतंय ‘बनवा बनवी’

बिग बॉसमध्ये कोण करतंय ‘बनवा बनवी’

किशोरी शहाणे सोबत टास्क करताना अभिजीत केळकर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या नॉमिनेशन टास्क, वाद-विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये बिग बॉसनी सदस्यांसाठी खूपच इंट्रेस्टींग टास्क दिले आहेत. सदस्यांमध्ये सध्या ‘सवाल ऐरणी’चा हा टास्क रंगत आहे. सुरेखा पुणेकर-विद्याधर जोशी, किशोरी शहाणे-अभिजित केळकर यांच्यामध्ये ‘सवाल ऐरणी’चा हा टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये या चौघांना बिग बॉस एक अनोखं आव्हान देणार आहेत.

बिग बॉस नेहमीच सदस्यांना नवनवीन टास्क देतात, हे आव्हान देखील तितकच वेगळ आणि कठीण असणार आहे. या टास्कदरम्यान विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांनी विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहे. हाच नियम किशोरी शहाणे-अभिजित केळकर यांना देखील लागू पडणार आहे. याच बरोबर दिलेल्या गाण्यावर नृत्य देखील सादर करायचे आहे. हे बघायला प्रेक्षकांना गंमत येणार हे नक्की !

विद्याधर जोशींची लावणी तर अभिजीतची मुलीची वेशभूषा

हाच टास्क पूर्ण करण्यासाठी विद्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली असून सुरेखा ताई, विद्याधर यांना ‘या रावजी’ ही लावणी शिकवणार आहे. तर किशोरी शहाणे अभिजित केळकरला ‘अशीही बनवा बनवी’ या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवणार आहेत. अभिजित केळकर मुलीच्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या टास्कमुळे घरातील वातावरण थोडं हलकफुलकं होईल यात शंका नाही.

First Published on: May 29, 2019 4:44 PM
Exit mobile version