महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी देणारा निघाला ‘चहावाला’

महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी देणारा निघाला ‘चहावाला’

अभिनेते महेश मांजरेकर आणि आरोपी

अभिनेते महेश मांजरेकर यांच्याकडे ३५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकवणारा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क एक चहा विक्रेता निघाला आहे. ठाणे जिल्ह्यातील दिव्यात चहाची टपरी चालवणारा हा खंडणीखोर लॉकडाऊनमध्ये गावी रत्नागिरी खेड येथे गेला होता. लॉकडाऊनमुळे हाती काम नसल्यामुळे पैसे कसे मिळवायचे म्हणून त्याने इंटरनेटवर युट्यूबचा आसरा घेतला होता. युट्युब सर्च करता करता त्याला झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याच्या डोक्यात खंडणीची कल्पना सुचली.

त्यासाठी त्याने गँगस्टर अबू सालेमची युट्युब वरून सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर त्याने एका वेबसाईटवरून अभिनेते महेश मांजरेकर यांचा मोबाईल क्रमांक शोधून त्याच्या मोबाईलवर गँगस्टर अबू सालेमच्या नावाने मेसेजस पाठवून चक्क ३५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणीसाठी त्याने त्यांना कॉलसह काही मॅसेज पाठविले होते. अटकेच्या भीतीने तो कल्याण येथून खेड येथे पळून गेला होता. तसेच फोन बंद करून ठेवला होता.

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणीखोराचा शोध घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणीखोराचा शोध घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईलसह दोन सिमकार्ड पोलिसांनी हस्तगत केली आहेत. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला बुधवार २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा आबू सालेमशी काहीही संबंध नाही, त्याने महेश मांजरेकर यांच्यासह इतर काही बॉलीवूडच्या कलाकारांना धमकी दिली आहे का? याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.

 

First Published on: August 28, 2020 12:32 AM
Exit mobile version